04 February 2011

धिंगाणा सुरु

            आम्ही कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यानंतर आमचे कॉलेज चालू झाले. नंतर आम्ही कॉलेजचा खूप आनंद घ्यायला सुरुवात केली. आम्ही आमच्या शिक्षकांच्या खूप टिंगल करायला सुरुवात केली. आमच्या क्लास मधील प्रत्येक  मुलाच्या अंगी काही न काही खोड होती. त्यामुळे कोणी न कोणीतरी मधूनच पिल्लू सोडून द्यायचे. त्यामुळे पूर्ण क्लास मध्ये हास्य पसरायचे. त्यामुळे शिक्षक खूप चिडायचे पण करणार काय हो ते पण कारण आमचे नगच 'एक से बढकर एक' होते.      
                आम्ही सर्वच नग एकत्र आल्याने सर्व शिक्षक त्रस्त झाले होते. त्यात आमच्या क्लासमधील मुली म्हणजे एकाही मुलीच्या तोंडावरून माशी सुद्धा उठत नव्हती. परंतु त्या सुद्धा खूप आनंद घ्यायच्या पण त्या काही बोलत नसे. त्यामुळे शिक्षक त्यांना अजिबात बोलत नसे.   आमचे शिक्षक आमच्यावर कायम चिडायचे.पण आम्ही कधीही कोणत्याही शिक्षकाला वैयक्तिक पातळीवर त्रास दिला नाही.     

No comments:

Post a Comment

Contact Us